बाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ

एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.

Updated: Aug 6, 2016, 09:53 PM IST
बाप चिमुरड्याला बिअर पाजतोय, आई काढतेय व्हिडिओ title=

चेन्नई : एका घरात स्मार्टफोनवर शूट झालेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये एका अवघ्या १० महिन्यांच्या बाळाला त्याचाच बाप जबरदस्तीनं बिअर पिण्यास भाग पाडताना दिसतोय. तर आई बापाचं हे कृत्य स्मार्टफोनमध्ये उतरवण्यात व्यस्त आहे.