आमिरला कानाखाली मारणाऱ्याला शिवसेनेकडून एक लाख रुपये

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने केलेल्या असहिष्णुततेच्या विधानावरुनचा देशभरात वाद सुरु आहे. आता शिवसेनेनेही आमिरविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. आमिरला थोबाडीत मारणाऱ्या इसमाला शिवसेनेने तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेय. शिवसेनेचे पंजाब प्रदेशाचे अध्यक्ष राजीव टंडन यांनी ही घोषणा केलीय.

Updated: Nov 26, 2015, 05:50 PM IST
आमिरला कानाखाली मारणाऱ्याला शिवसेनेकडून एक लाख रुपये title=

चंदीगड : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने केलेल्या असहिष्णुततेच्या विधानावरुनचा देशभरात वाद सुरु आहे. शिवसेनेनेही आमिरविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. आमिरला थोबाडीत मारणाऱ्या व्यक्तीला शिवसेनेने तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेय. शिवसेनेचे पंजाब प्रदेशाचे अध्यक्ष राजीव टंडन यांनी ही घोषणा केलीय.

आणखी वाचा असहिष्णूतावर आमिर खानला दिले राजनाथ सिंहांनी सडेतोड उत्तर

लुधियानामध्ये बुधवारी आमिरच्या वादग्रस्त विधानावंतर हिंदू संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला होता. तसेच लुधियानाच्या ज्या हॉटेलमध्ये आमिर थांबला होता त्या हॉटेलच्या बाहेर जोरदार निदर्शनेही करण्यता आली. तसेच त्याच्याविरोधात नारेबाजीही करण्यात आली.

  आणखी वाचा - आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

दिल्लीमध्ये झालेल्या एका समारंभात आमिर खानने भारतातील वाढत्या असहिष्णुततेबाबत वादग्रस्त विधान केले होते. देशातील वाढत्या असहिष्णुततेमुळे तसेच मुलांच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे पत्नी किरणने आपल्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता, असं वक्तव्य आमिरने केलं होतं. त्याच्या या विधानावर विरोधकांनी टीकेचा सूर आळवला आहे.

लखनऊमध्येही शिवसेना कार्यकर्त्यांनीही आमिरचा पुतळा जाळून विरोध व्यक्त केला. देशाच्या अखंडतेसाठी हा धोका आहे. या देशांत सर्वधर्माचे लोक सुरक्षित आहेत. एका कलाकाराने असे वक्तव्य करु नये, असे येथील शिवसैनिकांनी म्हटलेय. मुंबईमध्येही संतप्त शिवसैनिकांनी आमिरच्या घराबाहेर निदर्शने केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.