नवी दिल्ली : असहिष्णुता प्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर गुरूवारी लोकसभेत राजनाथ सिंह यांनी म्हटले की अपमान झाला तरी बाबासाहेब आंबेडकर हे देशातच राहिले, कधी देश सोडला नाही. भारताच्या मूळ स्वभावात लोकशाही आहे.
गुरूवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार पहिल्या दोन दिवस संविधानावर चर्चा सुरू आहे. संविधानावरचर्चा सुरू असताना गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अपरोक्षपणे कथित असहिष्णुतेवर हल्लाबोल केला. विरोधकांनी यावेळी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या वर्षी डॉ. बाबासाहेब यांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.
राजनाथ सिंह म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगितले की माझाही भारतात अपमान झाला होता. पण बाबासाहेब यांनी भारत सोडण्याची भाषा केली नव्हती. अपमान सहन केल्यावरही ते भारतात राहिले होते. आंबेडकर धर्मनिरपेक्षता हा भारताचा मूळ स्वभाव मानत होते.
राजनाथ सिंग म्हटले की श्रमिक कल्याणमध्ये आंबेडकरांचे योगदान होते. अनेक जल योजना आंबेडकरांच्या डोक्यातील कल्पना आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.