नवी दिल्ली : एअर इंडिया वादाप्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हल्ली जेथे जेथे जातात तेथे त्यांच्याभोवती मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांचा घेरा मोठा असतो. मीडियावाले तसेच सेल्फी घेणाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी गायकवाड स्वत:सोबत त्यांच्यासारखाच हुबेहूब दिसणारा डुप्लिकेट घेऊन फिरतायत.
शुक्रवारी गायकवाड मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी) येथे टीशर्ट आणि पँट या पेहरावात दिसले. त्यांच्यासोबत एक व्यक्ती उभा होत जो हुबेहूब त्यांच्यासारखाच दिसणारा होता.
या व्यक्तीचे नाव रत्नाकांत सागर असे आहे. रत्नाकांतही गायकवाड यांच्या उमरगा या गावात राहणारेच आहेत. तेही गायकवाड यांच्याप्रमाणेच शिवसेनेत आहेत.
तुम्ही या व्यक्तीला पहिल्यांदा बघाल तर रत्नाकांत आणि गायकवाड यांच्यात तुम्हाला अजिबात फरक दिसणार आहे. त्यामुळेच सध्या ते गायकवाडांसोबत दिसताहेत. जेव्हा कोणीही त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे सरसावतो तेव्हा ते रत्नाकांत यांना पुढे धाडतात. लोकही गायकवाड यांना समजून रत्नाकांत यांच्यासोबत सेल्फी काढतात.