जेव्हा दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर सुरु झाला पॉर्न व्हिडिओ

दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अचानकपणे पॉर्न सिनेमा सुरु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ एप्रिलला स्टेशनवर लागलेल्या एलईडी स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप चालली.

Updated: Apr 15, 2017, 04:42 PM IST
जेव्हा दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर सुरु झाला पॉर्न व्हिडिओ title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या राजीव चौक मेट्रो स्टेशनवर अचानकपणे पॉर्न सिनेमा सुरु झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ९ एप्रिलला स्टेशनवर लागलेल्या एलईडी स्क्रीनवर ही पॉर्न क्लिप चालली.

स्टेशनवरुन जाणाऱ्या लोकांनी एलईडी स्क्रीनवर सुरु असलेली की पॉर्न क्लिप मोबाईलवर शूट केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डीएमआरसीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या स्क्रीनवर पॉर्न व्हिडिओ चालला ती स्क्रीन कॉर्मर्शियल्ससाठी रिजर्व्ह होती.

चौकशी समिती याचा तपास करत आहे. ९ एप्रिलचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. राजीव चौक हे दिल्लीतील अतिशय गर्दीचं ठिकाण आहे. येथे दिवसभर लोकांची वर्दळ असते. राजीव चौक हे एक इंटरचेंज मेट्रो स्टेशन आहे. जेथे ब्लू लाईन आणि यलो लाईनचे प्रवासी गाड्या बदलतात.