गुडगाव: शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांचा विरोध सुरूच आहे. शनिवारी हा विरोध मुंबईतून थेट गुडगावला पोहोचला. गुडगावमध्ये होणारा पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला.
पाकिस्तानी झेंडा पाडला
शिवसेना कार्यकर्त्यांनी स्टेजवर लावलेला पाकिस्तानी झेंडा खाली फेकला आणि गोंधळ घातला. कार्यक्रम गुडगावच्या ओपन एअर थिएटरमध्ये सुरू होता. गोंधळामुळं काही काळासाठी कार्यक्रम थांबवण्यात आला. यानंतर कार्यक्रम झाला की रद्द केला गेला हे अद्याप कळू शकलेलं नाही.
अधिक वाचा - मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे- उद्धव ठाकरेंची घोषणा
गुडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थितीवर नियंत्रण मिळवलं. कार्यक्रमादरम्यान पोलीस तिथं नव्हते, असं लोकांचं म्हणणं आहे. तर आयोजकांच्या मते कार्यक्रमाला विरोध बघता पोलिसांना आधीच सूचना दिली होती.
यापूर्वी मुंबईत प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. तर पाकिस्तानी माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशनाचं आयोजन करणाऱ्य़ा सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला शिवसैनिकांनी काळं फासलं. यानंतर बीसीसीआय आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड अध्यक्ष यांच्या बैठकीलाही शिवसेनेनं विरोध केला.
अधिक वाचा - पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.