जया बच्चनवर शेरेबाजी, सुशीलकुमारांची माफी

सुशीलकुमार शिंदे यांच्यावर पहिल्याच भाषणात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. जया बच्चन यांच्यावर फिल्मी शेरेबाजी केल्यामुळं विरोधकांनी आक्षेप घेतला आणि शिंदेंनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2012, 05:39 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
राज्यसभेत आज नवे गृहंमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर पहिल्याच भाषणात दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. जया बच्चन यांच्यावर फिल्मी शेरेबाजी केल्यामुळं विरोधकांनी आक्षेप घेतला आणि शिंदेंनी आपले शब्द मागे घेत माफी मागितली.
शिंदे यांनी खासदार जया बच्चन यांना आसामच्या विषयावरून आज खडसावले आहे. आसाममध्ये झालेल्या हिसांचारामध्ये ७० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुद्दयावर जया बच्चन यांनी सरकारने याबाबत आतापर्यंत काय कारवाई केली असे विचारले. यावर शिंदे म्हणाले, शांतपणे ऐका मॅडम, आसाम हा चित्रपटातील विषय नाही. मी पण मुंबईचा आहे. मला कुटुंबातील सर्व माहिती आहे. तुम्ही मला उगाच बोलायला भाग पाडू नका.

यानंतर सभागृहामध्ये गोंधळ झाला आणि विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. यावर गृहमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले. मात्र, राज्य सभेचे विरोधी पक्षनेते अरून जेटली यांनी शिंदे यांना असे उत्तर देणे योग्य नसल्याचे सांगितल्यानंतर शिंदे यांनी आपले शब्द मागे घेतले.