नवी दिल्ली : शीना बोरा हिच्या खूनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जी याची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून शुक्रवारी लाय डिटेक्टर चाचणीची परवानगी मिळाली. त्यानंतर शनिवारी सीबीआयने सेंट्रल फोरेन्सिक सायन्स या प्रयोग शाळेत चाचणी केली.
शीना बोराच्या खुनाच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पीटर मुखर्जीला शुक्रवारी विशेष न्यायालयाने पॉलीग्राफ टेस्टची परवानगी दिली होती. शनिवारी सेंट्रल फोरेन्सिक सायन्स प्रयोग शाळेत सीबीआयने पीरटची चाचणी घेतली.
सीबीआय आणि डॉक्टर्स यांच्यासमोर करण्यात आलेल्या चाचणीमध्ये पीटर मुखर्जी आणि इंद्रायणीने केलेल्या वेगवेगळी आर्थिक गुंतवणुकीबाबत, बॅंक खाते व्यवहारच्या संबंधी प्रश्न विचारण्यात आले.
सीबीआयने पीटर मुखर्जीला ५० प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांमध्ये त्यांचे इंद्रायणी मुखर्जी सोबत असलेल्या संबंधाबाबत आधारित प्रश्न होते, अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.