मुंबई : शिना बोरा हत्या प्रकरणी त्तकालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणा-या तपास अधिका-यांची आज सीबीआयने तब्बल ३ तास चौकशी केली आहे.
शिना बोरा हत्या प्रकरणात राकेश मारिया यांना आधी पासूनच माहिती होती आणि त्यांनी त्यांच्या वेळेनूसार शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास केला आहे. तसंच इंद्रीणीचा नवरा पीटर मुखर्जीला वाचवण्याकरता मुंबई पोलिसांनी प्रयत्न केले असे आरोप मुंबई पोलिसांवर करण्यात आले होते.
याबाबत या पोलीसांची चौकशी झालीये की हत्येचा तपास कशा पद्धतीने केला याबाबत मात्र सीबीआय ने काहीच माहिती दिली नाही.