शरद पवारांचे नवे राजकीय भाकित, सरकार सहा महिनेच

२०१४चं चित्र विस्कळीत असेल. २०१४ ला निवडून आलेलं सरकार वर्ष सहामहिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा निवडणुकांची शत्यता असेल, असं भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2013, 12:05 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
२०१४चं चित्र विस्कळीत असेल. २०१४ ला निवडून आलेलं सरकार वर्ष सहा महिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा निवडणुकांची शत्यता असेल, असं भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय. युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे.
२०१४चं चित्र विस्कळीत राहणार असल्याचं भाकित पवारांनी करताना सांगितले, २०१४ला निवडून आलेलं सरकार वर्ष सहामहिनेच टिकणार आणि वर्षभरात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसंच त्यांनी युपीए तीनच्या भविष्याबाबतही साशंकता व्यक्त केलीय.
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिनी असे भाकित केल्याने राजकीय वर्तुळाच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी अगदी साध्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. यावेळी दिल्लीतील अनेक जेष्ठ नेते आणि मान्यवरांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.