नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाला एका महिलेने थप्पड लगावली आहे, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याविषयी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये १० जुलै रोजी एका पुस्तकाचे प्रकाशनाचा सोहळा होता. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उपस्थित होते. यामुळे घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था होती.
एका प्रवेशद्वारामधून केवळ पत्रकारांना प्रवेश दिला जात होता. त्या प्रवेशद्वारातून एका महिलेने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या सुरक्षारक्षकाने प्रवेश करण्यास रोखले, मात्र, काही वेळानंतर महिलेने अचानक सुरक्षारक्षकाला थप्पड लगावली.
महिलेने माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा रक्षकाला थप्पड लगावली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.