नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या अरवानी आणि अनंतनाग परिसरात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. दोन दहशतवादी लपल्याची माहिती आहे.
भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. हुसैनपुरा या भागात दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले.
सर्च ऑपरेशनच्यावेळी दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही ही चकमक सुरुच असल्याचे सांगण्यात येत आहे.