अपघातात 'सारा' जागेवरच गतप्राण पण, अमनमणिला साधी जखमही नाही...

बहुजन समाजवादी पार्टीचे नेते आणि मधुमिता हत्याकांडातील दोषी अमरमणि त्रिपाठी यांच्या मुलाचा आणि सुनेचा अपघात झालाय. यामध्ये अमरमनी यांची सून सारा (२७ वर्ष) हिचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमरमणि यांचा मुलगा आणि साराचा नवरा अमनमणि याला एक जखमही झालेली नाही. 

Updated: Jul 11, 2015, 10:23 AM IST
अपघातात 'सारा' जागेवरच गतप्राण पण, अमनमणिला साधी जखमही नाही... title=

फिरोजाबाद : बहुजन समाजवादी पार्टीचे नेते आणि मधुमिता हत्याकांडातील दोषी अमरमणि त्रिपाठी यांच्या मुलाचा आणि सुनेचा अपघात झालाय. यामध्ये अमरमनी यांची सून सारा (२७ वर्ष) हिचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमरमणि यांचा मुलगा आणि साराचा नवरा अमनमणि याला एक जखमही झालेली नाही. 

पोलीस अधिक्षक पीयूष श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री अमनमणि त्रिपाठी आपल्या पत्नीसोबत स्विफ्ट डिजायर गाडीतून लखनऊहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. समोरून येत असलेल्या एका सायकलस्वार मुलीला वाचवण्यासाठी गाडीवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याचं अमनमणि सांगतायत. 

पोलिसांनी साराचं शव पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलंय. साराच्या कुटुंबीयांनी मात्र या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केलीय. हा सारा प्रकार बनावट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

फिरोजाबाद पोलिसांनी अमनमणि त्रिपाठी यांना सिरसागंज परिसरातून अटक केलीय. अमनमणिला एका अपहरण प्रकरणात फरार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. अमनमणिच्या अटकेनंतर त्यानं सिव्हिल हॉस्पीटलमध्ये पत्रकारांनाही मारहाण केली. त्यानंतर जेलमध्ये कैद्यांनाही मारहाण केल्याचं समजतंय. न्यायालयानं अमनमणिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय.  


अमरमणि आणि मधुमिता

मधुमिता शुक्ला हत्याकांडाची आठवण 
साराच्या मृत्युमुळे २००३ मध्ये घडलेल्या मधुमिता हत्याकांडाच्या आठवणी ताज्या केल्यात. अमनमणिचे वडील माजी मंत्री अमरमणि उत्तरप्रदेशचे मातब्बर नेते. ५८ वर्षांचे अमरमणि आणि त्यांची पत्नी सध्या मधुमिता शुक्ला हिच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 

कवयित्री असलेल्या २२ वर्षीय मधुमिताशी अमरमणि यांचे अनैतिक संबंध होते. तिच्या पोटात वाढणाऱ्या सात महिन्यांच्या गर्भानं तीच्या मृत्यूनंतर हा खुलासा केला होता. डीएनए टेस्टमध्ये या भ्रुणाचा पिता अमरमणि असल्याचं समोर आलं होतं. 
 
 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.