कुपवाडामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतदवद्यला ठार करण्यात आलं आहे. जम्मूमधील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या  फायरिंगमध्ये एक बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.

Updated: Oct 24, 2016, 09:44 AM IST
कुपवाडामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार title=

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील कुपवाडामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतदवद्यला ठार करण्यात आलं आहे. जम्मूमधील आरएस पूरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या  फायरिंगमध्ये एक बीएसएफचा जवान शहीद झाला आहे.

बीएसएफचे जवान सुशील कुमार पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहीद झाले. पाकिस्तानकडून 20 हून अधिक पोस्टवर फायरिंग करण्यात आली. फायरिंगमध्ये एक जवान आणि एक नागरिक जखमी झाला आहे.