सलमान मुस्लिम म्हणून शिक्षा म्हणणारे सपा खासदार पलटले

 हिट अँड रन केसमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळालेल्या पाच वर्षाच्या शिक्षेनंतर वादग्रस्त विधानांची मालिका कायमच आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनीही या प्रकरणी वादग्रस्त विधान केले, विधान अंगलट येत असल्याचे पाहून कोलांटउडी घेतली आहे. 

Updated: May 7, 2015, 07:33 PM IST
सलमान मुस्लिम म्हणून शिक्षा म्हणणारे सपा खासदार पलटले title=

नवी दिल्ली :  हिट अँड रन केसमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मिळालेल्या पाच वर्षाच्या शिक्षेनंतर वादग्रस्त विधानांची मालिका कायमच आहे. समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनीही या प्रकरणी वादग्रस्त विधान केले, विधान अंगलट येत असल्याचे पाहून कोलांटउडी घेतली आहे. 

सलमान खान याला पाच वर्षांची शिक्षा मिळाल्यानंतर नरेश अग्रवाल म्हणाले की, सलमान एक महान कलाकार आहे. त्याला शिक्षा झाल्याने आम्ही दुःखी आहोत. देशात त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेऊन सलमानला शिक्षा दिली. कारण तो अल्पसंख्याक समुदायाचा असल्याने असे केले, त्यामुळे ही खूप संकुचित वृत्ती आहे. महाराष्ट्र सरकारला या पेक्षा चांगला विचार करायला हवा. 

नेहमी वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या एसपीचे राज्यसभा खासदार नरेश अग्रवाल यांनी या विधानावर वाद होताच आपले पाऊल मागे खेचले आहे. माझे संपूर्ण म्हणणे दाखविले नाही. संपूर्ण म्हणणे दाखविले असते तर त्याचा अर्थ वेगळा होतो. 

ते म्हणाले, मी एक वकील आहे, मला माहीत आहे कोर्टाचं काम कसं चालतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. कोर्टात तथ्य आणि पुरावे यांच्या आधारावर निर्णय घेतला जातो. धर्म आणि जातीच्या आधारावर निर्णय घेतला जात नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.