'संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक'

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईक आणि संघाची शिकवण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Oct 17, 2016, 05:39 PM IST
'संघाच्या शिकवणीमुळे सर्जिकल स्ट्राईक' title=

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईक आणि संघाची शिकवण यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा गांधींच्या राज्यातून आलेले पंतप्रधान आणि गोव्यातून आलेला मी यांचा सर्जिकल स्ट्राईकशी संबंध नव्हता. मात्र होती ती केवळ संघाची शिकवण असं खळबळजनक विधान पर्रिकरांनी केलं आहे.

उरी हल्ल्यानंतर 29 सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान आणि माझ्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असल्याचंही पर्रिकर म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचे काही जण पुरावे मागत आहेत. आपण लष्करानं केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही पर्रिकर यांनी दिली आहे. 

पाहा नेमकं काय म्हणाले मनोहर पर्रिकर