नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
मध्य प्रदेशच्या उज्जैन इथं आज संपलेल्या ३ दिवसीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. संघाच्या दृष्टीनं देशात असलेल्या ४१ प्रांतांचे ४१ प्रचारक, कार्यकारणीचे सदस्य आणि वरिष्ठ पदाधीकारांच्या बैठकीत हा निर्णय घेतलाय.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राम माधव यांना पक्षाचे महासचिव किंवा प्रवक्ते पद मिळेल. तसंच पक्षाचे महासचिव अमित शहा हे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, अशीही चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.