www.24taas.com, झी मीडिया, भोपाळ
मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणत्याही धर्मावर संकट येत नसल्याची मनमुराद फिरकी अभिनेते रझा मुराद यांनी शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी यांचे नाव न घेता घेतली.
ईद निमित्त आयोजित एका कार्यक्रमात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि अभिनेते रझा मुराद एका मंचावर उपस्थित होते. यावेळी शिवराजसिंह चौहान यांनी मुस्लिमांची टोपी घातली होती. त्यावर प्रसार माध्यमांनी रझा मुराद यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या ठिकाणी मी राजकीय प्रकरणावर भाष्य करणार नाही. पण काही असे मुख्यमंत्री आहे की ते मुस्लिमांची टोपी घातल नाही. मुस्लिमांची टोपी घातल्याने कोणाचा धर्मभ्रष्ट होत नाही. शिवराजसिंह चौहान यांच्याकडून काही मुख्यमंत्र्यांनी शिकावे, असाही टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.
दोन वर्षांपूर्वी मुस्लिम धर्मगुरू सय्यद इमाम शाही सय्यद यांनी मोदी यांचे सदभावना उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना मुस्लिमांची टोपी भेट देऊन ती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोदींनी त्यावेळी ती टोपी घालण्यास नकार दिला होता.
देशातील सर्वोच्च पदावर जायचे असेल, तर सर्व समाजाला बरोबर घेऊन जावे लागते, असा टोलाही त्यांनी मोदी यांना लगावला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.