उज्जैन : स्कूलबसमध्ये चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना, मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये मंगळवारी घडली. बसचा कंडक्टर महेश बागवानला पोलिसांनी या प्रकरणीअटक केली आहे. चारवर्षांची ही चिमुकली नर्सरीमध्ये आहे.
सर्व मुले बसमधून उतरल्यानंतर महेशने धावत्या बसमध्ये चिमुकलीवर बलात्कार केला.
पीडित मुलगी चार वर्षांची आहे, घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी लगेचच पोलिस स्थानक गाठत आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.
या प्रकरणात ड्रायव्हरची भूमिका संशयास्पद असून, पोलिस ड्रायव्हरचीही चौकशी करत आहे. कंडक्टर महेश बागवान पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.