जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार

जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार, दिल्लीतील एका महिलेने  केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

Updated: Feb 28, 2016, 11:26 PM IST
जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार  title=

हरियाणा : जाट आंदोलनादरम्यान मुरथलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार, दिल्लीतील एका महिलेने  केली आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी 7 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रारीत दीराचं नावदेखील असल्याने पोलिसांनी कौटुंबिक वादातून तक्रार केली असल्याची शंका व्यक्त केली आहे.

महिलेने तक्रारीत २२ आणि २३ फेब्रुवारीच्या रात्री बलात्कार झाल्याची तक्रार केली आहे. पोलिसांनी महिलेचा जवाब नोंद करुन घेतला आहे, तसंच तक्रारदेखील दाखल करुन घेण्यात आहे.  

पिडीत महिलेने डीआयजी राजश्री सिंग यांना शनिवारी फोन करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महिलेने जाट आंदोलनादरम्यान बलात्कार झाल्याची तक्रार केली असल्याची माहिती डीआयजी राजश्री सिंग यांनी दिली आहे.