प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात!

प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरैशी यांनी केलाय. 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात त्यांनी हा युक्तीवाद मांडलाय. 

Updated: May 10, 2015, 11:32 AM IST
प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात! title=

हैदराबाद: प्रभू रामचंद्रांची अयोध्या भारतात नाही तर पाकिस्तानात आहे असा अजब दावा मुस्लिम नेते अब्दुल रहीम कुरैशी यांनी केलाय. 'फॅक्ट्स ऑफ अयोध्या एपिसोड' या पुस्तकात त्यांनी हा युक्तीवाद मांडलाय. 

प्रभू रामचंद्रांनी रचलेली अयोध्या पाकिस्तानातील पश्चिम उत्तर सीमेजवळ असलेल्या पख्तूनख्वा जिल्ह्यात आहे. अकराव्या शतकात हिंदूंनी साकेत शहराचं नामांतर अयोध्या केलं आणि परिसरातील शहराच्या नावांचंही रामकथेप्रमाणं नामांतर केल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. 

सध्या उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अयोध्येचं मूळ नाव साकेत होतं. कारण इसवी सन पूर्व सातशे वर्षांपूर्वी माणसांनी इथं राहाण्यास सुरुवात केली. तर रामाचा जन्म १८० कोटी वर्षांपूर्वी झाला होता. त्यामुळे सध्या असलेली अयोध्या प्रभू रामचंद्रांची नसल्याचा दावा कुरैशींनी केलाय.

अब्दुल रहीम कुरैशी हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सहाय्यक सरचिटणीस आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.