पतंजलीची नेपाळमध्ये गुंतवणूक, २० हजार लोकांना मिळणार रोजगार

योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना भारतात मिळत असेलली पसंती पाहता नेपाळमध्येही आता पतंजलीच्या उत्पादनांचा कारखाना सुरु कऱण्यात आलाय.

Updated: Nov 25, 2016, 03:15 PM IST
पतंजलीची नेपाळमध्ये गुंतवणूक, २० हजार लोकांना मिळणार रोजगार title=

काठमांडू : योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना भारतात मिळत असेलली पसंती पाहता नेपाळमध्येही आता पतंजलीच्या उत्पादनांचा कारखाना सुरु कऱण्यात आलाय.

नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारींच्या हस्ते गुरूवारी या नवीन कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल, नेपाळी कॉग्रेस अध्यक्ष बहादूर देउबा यांसारखी बडे नेतेमंडळी आणि
अनेक बिझनेसमन यावेळी उपस्थित होते.
 
याप्रसंगी नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी सांगितले की, नेपाळ हे राज्य जैवविविधतेने संपन्न आहे. नेपाळमध्ये हा कारखाना उभारल्याने भारत आणि नेपाळमधील व्यापार संबंध अधिक मजबूत होतील तसेच देशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मदत होईल.
 
पतंजली उत्पादनाबद्दल ग्राहकांची पसंती पाहता उत्पादनाची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे भारतासोबतच भारताबाहेरही उद्योग विस्ताराच्या उद्देशाने हा कारखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
 
पतंजली आयुर्वेदीक प्रायव्हेट लिमिटेडने एकूण १.६ अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक  कारखान्यासाठी केली आहे. यासाठी ९० टक्के कच्चा माल भारतातून निर्यात केला जाणार आहे.जैविक औषधे, सौंदर्य प्रसादने, खाद्यपदार्थ आणि इतर आयुर्वेदिक उत्पादन मिळून एकूण ५५ प्रकारच्या उत्पादनाची निर्मिती केली जाणार आहे.