'एअर इंडिया'चा प्रवास 'राजधानी'दरात

 'राजधानी'च्या दरात करा 'एअर इंडिया'चा प्रवास करण्याची एक अनोखी संधी प्रवाशांना आहे, पण यासाठी एक अट आहे, जेव्हा ऐनवेळेस ही सीट खाली असेल, त्याच वेळेस या दरात तुम्हाला ती देण्यात येईल. निदान  ४ तास आधी ही सीट तुम्ही बुक करणे अपेक्षित आहे.

Updated: Jul 11, 2016, 07:20 PM IST
'एअर इंडिया'चा प्रवास 'राजधानी'दरात  title=

नवी दिल्ली :  'राजधानी'च्या दरात करा 'एअर इंडिया'चा प्रवास करण्याची एक अनोखी संधी प्रवाशांना आहे, पण यासाठी एक अट आहे, जेव्हा ऐनवेळेस ही सीट खाली असेल, त्याच वेळेस या दरात तुम्हाला ती देण्यात येईल. निदान  ४ तास आधी ही सीट तुम्ही बुक करणे अपेक्षित आहे.

 एअर इंडियाच्या नव्या सवलतीनुसार, कंपनीचे विमान उड्डाण होण्याच्या ४ तास आधी जागा रिकामी झाल्यास प्रवाशांना राजधानी एक्सप्रेसच्या 'एसी 2-टियर'च्या दरात प्रवास करता येणार आहे. 

देशांतर्गत दिल्ली-मुंबई, दिल्ली-चेन्नई, दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-बंगळुरु मार्गांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

राजधानी एक्सप्रेसच्या दिल्ली-मुंबई एसी 2-टियर प्रवासाचे तिकीट 2 हजार 870 रुपये आहे. त्याचप्रमाणे दिल्ली-चेन्नई प्रवासाचे तिकीट 3 हजार 905 रुपये, दिल्ली-कोलकाता प्रवासाचे 2 हजार 890 रुपये आणि दिल्ली-बंगळुरु प्रवासाचे तिकीट 4 हजार 095 रुपये आहे.

प्रवाशांना ऐनवेळी तिकीट आरक्षित केल्यास भरमसाट दरापासून मुक्तता देण्यासाठी आणि सोबतच विमानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.