Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा...

Chhath Puja 2024: उत्तर भारतात छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यादिवसात सूर्य नारायणाचे महत्त्व अधिक असते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 5, 2024, 06:16 PM IST
Chhath Puja 2024: महाभारत युद्धात सूर्यदेवाने वाचवले होते अर्जुनाचे प्राण, वाचा पौराणिक कथा... title=
Chhath Puja 2024 Surya miracle in Mahabharata life of brave warrior Arjun was saved

Chhath Puja 2024: सूर्या उपासनेचे महापर्व छठची सुरुवात झाली आहे. नहाय खायपासून या व्रताची सुरुवात होते. ते 8 नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव सुरू असतो. असं म्हणतात की, सूर्याची उपासना करणाऱ्या लोकांच्या कुटुंबाला सुख आणि समृद्धी मिळते. सूर्य त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात. पण तुम्हाला माहितीये का महाभारतात सूर्यदेवामुळं अर्जुनाची जीव वाचवला. 

पौराणिक कथेनुसार, जेव्हा अर्जुनाने महाभारतातील युद्धाच्यावेळी एक शपथ घेण्यात आली होती.  ही शपथ पूर्ण करण्यासाठी अर्जुनाने जीवाची बाजी लावण्यात आली होती. अर्जुनाने शपथ घेतली होती की, जर सूर्यास्ताआधी मी जयद्रथाचा वध केला नाही तर यथेच अग्नीसमाधी घेईन. 

अर्जुनच्या शपथेबद्दल जेव्हा कौरवांना कळालं तेव्हा त्यांनी जयद्रथाला वाचवण्यासाठी रणनिती आखली. सर्व योध्यांनी जयद्रथची सुरक्षा वाढवली. सर्वाचा एकच प्रयत्न होता की जयद्रथला वाचवायचे. भगवान कृष्णांना जेव्हा अर्जुनाच्या या प्रतिक्षेबाबत कळलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. जर अर्जुन जयद्रथचा वध करु शकला नाही तर महाभारतच संपून जाईल आणि पांडव युद्ध हारतील. 

युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा पांडवांनी जयद्रथला शोधण्यास सुरुवात केली मात्र कौरवांनी जयद्रथच्या रथाला घेरलं होतं. तेव्हा अचानक सूर्य ढगांच्या आड गेला. पृथ्वीवर अंधार झाला. त्यामुळं कौरवांना वाटले की सूर्यास्त झाला. आता अर्जुनची प्रतिज्ञा मोडणार आणि तो अग्नीसमाधी घेईल. त्यामुळं कौरवांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. 

अर्जुनाने आता अग्नीसमाधी घ्यावी यासाठी कौरव आग्रह करु लागले. जयद्रथानेदेखील अर्जुनासमोर येऊन त्याला आव्हान दिलं. त्याचवेळी ढगांच्या आड लपलेला सूर्य बाहेर आला. तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले. मात्र तेव्हाच श्रीकृष्णांनी सांगितले की, तो पहा सूर्य अन तो जयद्रथ, असं अर्जुनाला सांगितले. तेव्हा वेळ न दवडता अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. 

खरं तर, ज्या दिवशी अर्जुनाने शपथ घेतली त्यादिवशी सूर्यग्रहण होते. जयद्रथ वधावेळी सूर्यग्रहण होते, असे महाभारतात वर्णन आहे, असे सांगितले जाते. सूर्यग्रहणामुळे महाभारत युद्ध भूमीवर सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाचे प्राण वाचल्याचे सांगितले जाते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)