आता 600 रुपयांत करा विमान प्रवास, एअरएशिया इंडियाची ऑफर

डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानंच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडियानं विमान प्रवासाच्या भाड्यासंदर्भात स्पर्धा सुरू केलीय. त्यांनी 600 रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिलीय. 

Updated: Aug 26, 2014, 11:14 AM IST
आता 600 रुपयांत करा विमान प्रवास, एअरएशिया इंडियाची ऑफर title=

नवी दिल्ली: डोमेस्टिक विमान प्रवासामध्ये नव्यानंच पाऊल ठेवलेली कंपनी एअरएशिया इंडियानं विमान प्रवासाच्या भाड्यासंदर्भात स्पर्धा सुरू केलीय. त्यांनी 600 रुपयात विमान प्रवास करायची संधी उपलब्ध करून दिलीय. 

विमान कंपनीच्या ऑफर नुसार तुम्ही 26 ऑक्टोबर 2014 पासून 24 ऑक्टोबर 2015पर्यंत हा विमान प्रवास करू शकता. ही सेवा प्राप्त करण्यासाठी तिकीटांचं बुकिंग मात्र 31 ऑगस्ट 2014पर्यंतच करायचंय.  

कंपनीनं बंगळुरूपासून चेन्नई आणि कोच्चीसाठी विमान प्रवासाचं भाडं 600 रुपयांपासून सुरू केलंय. बंगळुरू ते गोवासाठी तिकीट असेल 900 रुपये. तर बंगळुरू, चंदीगढ आणि जयपूरसाठी तिकीटाची किंमत 1900पासून सुरू असले. 

मलेशिया एअरलाइंस एअरएशियाच्या घरगुती एअरएशिया इंडियानं भारतीय विमान क्षेत्रात उतरतांना सांगितलं होतं की, त्यांच्या तिकीटांची किंमत इतर विमान कंपन्यांच्या तिकीटांपेक्षा 35 टक्के कमी असतील. एअरएशिया इंडिया सध्या बंगळुरू ते चेन्नई, कोच्ची आणि गोवासाठी प्रवास करतात. लवकरच देशातील इतर शहरांदरम्यान कंपनी विमान सेवा सुरू करेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.