दीपक भातुसे,www.24taas.com,मुंबई
२६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित राहाण्यासाठी अहमदाबादला जात आहेत. राज आणि मोदी यांच्यातील दृढ संबंध यापूर्वीही दिसून आले आहेत.
६२ वर्षीय मोदी गुजरातमध्ये २००१पासून राज्य करीत आहेत. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची सत्ता संभाळली होती. त्यांनी २००७ मध्ये गुजरातची कमान हाती घेतली. सर्वाधिक काळ राज्य चालविण्याचा मान नरेंद्र मोदींकडे जातो. याच वर्षी त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना २,०६३ दिवस पूर्ण केलेत. २००७ मध्ये ते दुसऱ्यांदा त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय संपादन केला. त्यानंतर त्यांनी पाठिमागे वळून पाहिले नाही. भाजपची घौडदौड सुरूच राहिली आहे.
विकासाच्या मुद्द्यावर वारंवार निवडून येणाऱ्या नरेंद्र मोदींची राज ठाकरेंनी नेहमीच तारीफ केली आहे. मोदींना विकासाचे राजदूत म्हणत राज ठाकरेंनी ३ ते १२ ऑगस्ट २०११ ला गुजरातचा अभ्यास दौराही केला होता. मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचं अवलोकन करून तसा विकास महाराष्ट्रात कसा करता येईल, यावर मोदींशी राज यांनी प्रदीर्घ चर्चाही या दौऱ्यात केली होती.