रेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार

रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.

Updated: Nov 3, 2014, 07:57 PM IST
रेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार title=

मुंबई : रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.

 रेल्वेने नवीन व्यवस्था सुरू केली असून 'फुल रिफंड' मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे चुकल्याचा आणि आरक्षणसाठीचे पैसेही गेल्याचे दु:ख आता काहीसे कमी होणार आहे.

आरक्षण केल्यानंतर काही वेळा उशीर होतो आणि गाडी निघून जाते. अशावेळी रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर पूर्वी अर्धीच रक्कम परत मिळायची. मात्र आता तसे होणार नाही. गाडी निघून गेल्यानंतर दोन तासात तिकीट रद्दल केल्यास तिकीटाचे पूर्ण पैसे मिळणार आहे. फक्त 'रिझर्व्हेशन चार्जेस' त्यातून वगळले जातील. हा नवा बदल लवकरच रेल्वेच्या तिकीट बुकींग सेवेत करण्यात येणार आहे.

ऑनलाईन टीडीआर दाखल करा
तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं असेल, तर आयआरसीटीसीवर आपल्या अकाऊंटमध्ये जाऊन तुम्हाला परतावा मिळवण्यासाठी, देखिल टीडीआर तेथेच दाखल करता येतो, त्यासाठी काही तासांचा अवधी तुम्हाला देण्यात आला आहे.

तिकीट रद्द कसे करणार?
गाडी सुटल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणाहून प्रवासाला सुरुवात करणार होता, त्या स्टेशनच्या मॅनेजरकडे जावे लागेल. त्यांच्याकडून तिकीट डिपॉझिट रिसिप्ट (TDR) भरून जमा करावी लागेल. तसेच तिकीट रद्द करण्याचे कारण देखील सांगावे लागणार आहे. जर ते कारण स्टेशन मॅनेजरला योग्य वाटले तर त्यांच्याकडून अर्ज व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर केवळ आरक्षणासाठी लागणारे पैसे कापून तिकिटाची रक्कम तुम्हाला परत केली जाईल. तर आठवड्यात तिकीट रद्द केल्यास १० टक्के रक्कम परत मिळते ही व्यवस्था कायम राहणार आहे.

तसेच रेल्वेच्या नियमांनुसार जर गाडी तीनतासाहून अधिक वेळ जर उशिराने धावत असेल तर तुम्ही तिकीट रद्द करून पूर्ण पैसे परत घेऊ शकतात. तसा नियम आधीपासूनच लागू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.