दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या, भाजपची मागणी

दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी भाजपने केलीय. दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सोमवारी सकाळी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उपाध्याय यांनी जंग यांना भाजपची भूमिका मांडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Nov 3, 2014, 04:41 PM IST
दिल्लीत पुन्हा निवडणुका घ्या, भाजपची मागणी title=

नवी दिल्ली : दिल्लीत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी भाजपने केलीय. दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी सोमवारी सकाळी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उपाध्याय यांनी जंग यांना भाजपची भूमिका मांडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अधिकृतपणे समजलेलं नाही. दिल्लीमध्ये सरकार स्थापनेसाठी जंग हे आज भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. 

दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत निवडणूक घेतली जाईल, असा भाजपचा अंदाज असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

दिल्ली विधानसभा 

भाजप-शिरोमणी अकाली दल ३२ जागा, आम आदमी पार्टी २८ जागा

(लोकसभा निवडणुकीत ३ सदस्य खासदार झाल्याने भाजप-शिरोमणी अकाली दलाच्या जागा २९ झाल्या आहेत)

दिल्लीच्या ७० सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप-शिरोमणी अकाली दल युतीने ३२ जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यांपैकी ३ सदस्य हे लोकसभा निवडणूक जिंकून खासदार झाल्याने या युतीच्या एकूण जागा २९ झाल्या आहेत. भाजपखालोखाल आपने २८ जागा जिंकल्या आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.