कोच्चिन : दक्षिण रेल्वेनं द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांना 'थ्री टायर एसी' कोचमध्ये बदलण्याचा निर्णय घेतलाय. जुन्या द्वितीय श्रेणी स्लीपर डब्यांच्या जागी आता नवीन थ्री टायर एसी डब्बे आणण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय.
यासाठी, दक्षिण रेल्वेनं पाच वर्षांच्या आतील एक्सप्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेचा विचार सुरू आहे. दक्षिण रेल्वेने रविवारी एर्नाकुलम निजामुद्दीन 12617 मंगला एक्सप्रेसच्या 'एस 2' या द्वितीय श्रेणी स्लीपर डब्याचं रूपांतर एसी 3 टायर डब्यात केलंय. आता या एक्सप्रेसमध्ये 11 ऐवजी 10 स्लीपर डब्बे असतील.
चेन्नई येगमोर आणि मंगलोर एक्सप्रेस अप आणि डाऊन यांचे देखील मंगळवारी काही स्लीपर डब्याचं एसी थ्री टायरमध्ये रूपांतर होणार आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानुसार रेल्वेचे काढलेले जुने स्लीपर डब्बे पॅसेंजर गाड्यांना जोडण्यात येतील. रेल्वेने द्वितीय श्रेणी स्लीपर डब्याचं उत्पादन कमी करून एसी डब्यांच्या उत्पादनात वाढ केलीय.
एर्नाकुलम निजामुद्दीन द्वितीय श्रेणी स्लीपरचं भाडं 925 रुपये होतं. पण आता थ्री टायर एसीसाठी 2370 रूपये मोजावे लागतील. म्हणजेच, याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावरचं होणार आहे. पण, यामुळे आरामदायक प्रवास होणार असल्यानं बहुसंख्य प्रवासी सुखावलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.