मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट!

विरोधकांच्या गोंधळात आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.

Updated: Jul 7, 2014, 11:18 PM IST
मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट! title=

नवी दिल्ली: विरोधकांच्या गोंधळात आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.

नुकतीच रेल्वे भाडेवाढ केल्यानंतर आता रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय आहे, याची उत्सुकता आहे. निवडणुकीपूर्वी जनतेला स्वप्न दाखवलेल्या भाजप सरकारकडून प्रवाशांना अपेक्षा आहेत.

महाराष्ट्र आणि मुंबईकरांच्या वाट्याला काय येणार याकडेही लक्ष लागलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.