नवी दिल्ली : आता सादर होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये केंद्र सरकार शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये डिस्पोजेबल चादरीची सोय करण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, सरकार या रेल्वे बजेटमध्ये शताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेससाठी काही नवीन प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. तर प्रवासी डब्याला आग लागण्याची समस्या रोखण्यासाठी एक नवीन प्रणाली स्थापित केली जाण्याचीही शक्यता आहे.
एनडीए सरकार ८ जुलैला आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर करणार आहे. या रेल्वे बजेटमध्ये उच्च क्षमता असलेले दृग्ध वॅन आणि मिठांची वाहतूकींचे हलके डब्बे निर्माण करणार असल्याची घोषणा केली जाऊ शकेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पहिल्या बजेटमध्ये प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा आणि रेल्वे गाडीत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.