दिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे

 दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.

Updated: Jul 3, 2014, 11:30 AM IST
दिल्ली-आग्रा धावणार हाय स्पीड रेल्वे  title=

नवी दिल्ली : दिल्ली ते आग्रा दरम्यान 160 किलोमीटर प्रती तास वेगाने हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. या सेमी हाय स्पीड ट्रेनची चाचणी आज घेण्यात आली. या गाडीचr औपचारीक सुरुवात नोव्हेंबरमध्ये केली जाणार आहे.

5400 एचपी इलेक्ट्रिक लोको मोटीव्हने पॉवर असणारी ही ट्रेन आज सकाळी दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन सुटली. ती आग्र्याला 90 मिनिटात पोहोचेल. साधारण दिल्लीवरून आग्र्याला जाण्यास किमात 2 तास 30 मिनिटे लागतात. त्यामुळे आता 1 तास वाचणार आहे. ही रेल्वे 160 किमी वेगाने धावेल. तशी चाचणी घेण्यात आली. या गाडीला 10 डिब्बे असणार आहेत.

ही देशातील अती स्पीड धावणारी ट्रेन असणार आहे. याआधी देशात भोपाळ शताब्दी एक्सप्रेस जास्तीत जास्त 150 किमी वेगाने धावते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.