नवी दिल्ली : बिहार माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आयकर विभागाने लालू प्रसाद यादव आणि त्याच्या मुलांच्या घरावर छापा टाकला आहे.
लालू आणि त्यांच्या मुलाच्या एकूण २२ ठिकाणच्या मालमत्तेवर सीबीआयने धाड टाकली आहे. दिल्लीतील एनसीआरमधील लालू यादव यांच्या मुलाच्या घरी हे छापे आहेत.
लालू यादव यांच्या घरी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हे छापे टाकण्यात आले. राजदचे खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या घरी देखील छापेमारी झाली आहे.