चेन्नई : सत्तेत असतांना फारसं शेतकऱ्यांकडे लक्ष न देणाऱ्या काँग्रेसने पुन्हा एकदा आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. मात्र सत्तेत आल्यानंतर भूसंपादन विधेयकाला हात घालून, शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणाऱ्या भाजपविरोधात काँग्रेसने पुन्हा शेतीचा मुद्दा उतरवला आहे.
काँग्रेस पक्षाने एकूणच शेतकऱ्यांच्या पंजाब आणि तेलंगणामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार आहेत, असे प्रदेश काँग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात आले.
तामिळनाडू प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. तामिळनाडूचा दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले आहे, असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे. केंद्रातील एनडीए सरकारची भूमिका जनविरोधी असल्याची टीका काँग्रेसने या वेळी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.