मेणबत्ती मोर्चावेळी राहुल गांधी ताब्यात, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं

ओआरओपीच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली.

Updated: Nov 3, 2016, 11:21 PM IST
मेणबत्ती मोर्चावेळी राहुल गांधी ताब्यात, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं  title=

नवी दिल्ली : ओआरओपीच्या मुद्द्यावरून माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केली. ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

ग्रेवाल यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ काँग्रेसनं मेणबत्ती मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन तासानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना सोडून दिलं. दरम्यान मोदी सरकारनं मृत सैनिकाच्या कुटुंबियांची माफी मागायला हवी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.