राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

Updated: Dec 16, 2016, 04:38 PM IST
राहुल गांधींनी घेतली पंतप्रधानांची भेट title=

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी राहुल गांधींबरोबर मल्लिकार्जुन खरगे, गुलामनबी आझाद, ज्योतिरादित्य सिंदिया, राज बब्बर हे नेते उपस्थित होते.

शेतक-यांच्या कर्जमाफीविषयी निवेदन यावेळी पंतप्रधान मोदींना देण्यात आलं आहे.. याशिवाय शेतक-यांच्या विविध समस्या, शेतकरी आत्महत्या आणि शेतीमाला भाव याविषयी या भेटीत चर्चा झाली आहे. राहुल गांधींनी नुकताच उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये किसान यात्रा केली. या वेळी शेतकऱ्यांनी सांगितलेल्या समस्या राहुल गांधींनी पंतप्रधानांना सांगितल्या.

शेतकऱ्यांची समस्या गंभीर असल्याचं पंतप्रधानांनी मान्य केलं आहे, पण या समस्या सोडवण्याबाबत त्यांच्याकडून कोणतंही आश्वासन देण्यात आलं नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

यंदाचं हिवाळी अधिवेशन नोटबंदीच्या निर्णयामुळे पाण्यात गेलं. विरोधकांनी या अधिवेशनामध्ये जोरदार गोंधळ घातल्यामुळे एकही दिवस काम झालं नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. पंतप्रधानांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. मी बोललो तर भूकंप होईल, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला होता. या आरोपानंतर मोदी आणि राहुल गांधींची भेट झाली आहे.