राहुल असहिष्णूतेच्या मुद्दावर आक्रमक, मोदींवर जहरी टीका

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आज आक्रमक होतांना दिसले. असहिष्णूतेच्या मुद्दावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 

Updated: Dec 1, 2015, 06:04 PM IST
राहुल असहिष्णूतेच्या मुद्दावर आक्रमक, मोदींवर जहरी टीका title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेत आज आक्रमक होतांना दिसले. असहिष्णूतेच्या मुद्दावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 

भाजपच्या मंत्र्यांनी आणि खासदारांनी सामाजिक वातावरण बिघडवणारी वक्तव्य केली तरी पंतप्रधानांनी त्यावर केवळ बघ्याची भूमिका घेत मौन बाळगल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 

मोदी अच्छे दिन विसरले असून गुजरातच्या विकासाचा फुगाही आता फुटला असल्याची टीकाही त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.