नवी दिल्ली : गृहीणींसाठी एक वाईट बातमी. विनाअनुदानित गॅस सिलिंडर महागला आहे. ६१.५० रुपयांनी सिलिंडर महागलाय. तर विमान इंधन १.२० रुपयांनी स्वस्त झाले आहे. विमान इंधनाच्या किंमतीत गेल्या तीन महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आलेय.
सरकारी तेल कंपनीने दिल्लीत जाहीर केले की, विना अनुदानित सिलिंडरची किंमत वाढली आहे. १४.२ किलोचा विनाअनुदानीत सिलिंडर राजधानीत दिल्लीत ६०६.५० रुपये झाला आहे. याआधी या सिलिंडरची किंमत ५४५ रुपये होती. विनाअनुदानीत सिलिंडरच्या किंमती दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याआधी एलपीजी सिलिंडरचा भाव २७.५ रुपयांनी वाढविण्यात आला होता.
सरकार ग्राहकांना एकावर्षात १४.२ किलोचे १२ एलपीजी सिलिंडर अनुदानित देतात. त्यानंतर १३ वा सिलिंडर बाजार भावाने सिलिंडर दिला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.