एक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.

Updated: Dec 17, 2015, 12:22 PM IST
एक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी title=

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.

पूरग्रस्त भागात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले ते मुंबईतील एका कंपनीने. लिव्हिंगगार्ड टेक्नोलॉजीजने त्यासाठी पुढाकार घेतला. ही कंपनी शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यात प्रसिद्ध आहे. कंपनी दूषित पाण्याचा वापर करून ते शुद्ध स्वच्छ करून उपलब्ध करुन देते. यासाठी विजेचा वापर केला जात नाही हे विशेष. दूषित झालेले आणि अनेक घटक मिसळेले पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी केवळ १ पैसा प्रति लीटर खर्च येतो.

पाणी समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने मोठी जबाबदारी उचलली. विविध समाजिक संस्थाच्या माध्यमातून कंपनीने ५०० लिव्हिंगगार्ड ड्रिंकिंग वॉटर फिल्टर दान केलेत. प्रत्येक फिल्टर रोज १०० ते २०० लीटर शुद्ध पाणी करतो. दर दिवशी सर्व फिल्टर्स ५० ते ६० हजार लीटर बॅक्टीरिया आणि विषाणू वेगळे करून शुद्ध पाणी करतात. त्यामुळे  ३५ ते ४० हजार लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालेय.

आपतग्रस्तांना लिव्हिंगगार्ड आणि महिंद्राने 'मोबाईल ड्रिंकिंग वॉटर ब्रिगेड' विकसित केला. त्यामुळे या वाहनाच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात जाऊन शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन देणे सोपे गेले. प्रति तास १ हजार लिटर पाणी उपलब्ध करुन दिले जाते.  तसेच या वाहनामध्ये ३०० लिटर पाणी साठवूण ठेवण्याची क्षमताही आहे.