नवी दिल्ली : संसदेत सतत गैरहजर राहणाऱ्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. मंगळवारी झालेल्या संसदीय बैठकीत वारंवार गैरहजर राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी जाब विचारला आहे.
कमी उपस्थिती दर्शवणाऱ्या सभासदांमध्ये पूनम महाजन, प्रीतम मुंडे, वरुण गांधी, बाबूल सुप्रीयो आदींचा समावेश होता. त्यामुळं मुंबईच्या खासदार पूनम महाजन आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही पंतप्रधान मोदींच्या रोषाला सामोरं जावं लागलं. बैठक सुरु असतानाच त्यांना उभं करून पंतप्रधान मोदींनी त्यांना खडे बोल सुनावले.
लोकसभेत भूसंपादन विधेयकाच्या मतदानावेळी गैरहजर राहिलेल्या पक्षाच्या वीसही खासदारांना बैठकीत उभं केलं होतं. तसंच जनतेनं तुम्हाला कशासाठी निवडून दिलं आहे, असा सवालही मोदींनी त्यांना केला.