नवी दिल्ली : रेल्वेने सामान्यांना दिलासा देताना तिकिट वाढ केली नव्हती. मात्र, आता सेवाकरानंतर प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. आता हे तिकिट १० रुपयांना मिळणार आहे.
ही तिकिट दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. तसेचर १ एप्रिलपासून प्रवासी ६० दिवसांऐवजी १२० दिवस आधी रेल्वेचे आरक्षण करता येऊ शकणार आहे. राज्यसभेत मंगळवारी आवाजी मतदानाने रेल्वे अर्थसंकल्प मंजूर करून लोकसभेकडे परत पाठवण्यात आला आहे.
रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट १ एप्रिलपासून ५ रुपयांच्या ऐवजी १० रुपये करण्यात आल्याचे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रॅली, यात्रा, उत्सव किंवा विशेष कार्यक्रमाच्यावेळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वे व्यवस्थापकाला प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांपेक्षा अधिक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. रॅली, यात्रा किंवा उत्सवादरम्यान प्लॅटफॉर्मवर अधिक गर्दी होते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या प्रकारचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या महिन्याच्या अखेरपर्यंत रेल्वेची सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. रेल्वे खासगीकरण होणार नाही. रेल्वे राष्ट्राची संपत्ती आहे, असे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी याआधी सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.