सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा

जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.

Updated: Dec 16, 2015, 02:21 PM IST
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा title=

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.

मंगळवारी सोने दरात १६० रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळाली. सोने २५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम असा दर होता. तर चांदीचा भाव २०० रुपयांनी घटून ३३,५०० रुपये किलो दर होता.

चार प्रमुख महानगरातील सोने आणि चांदीचा दर
दिल्ली - २५६९० (सोने), ३३५०० (चांदी)
मुंबई - २५२३० (सोने), ३३७२० (चांदी)
कोलकाता - २५६७० (सोने), ३३२५० (चांदी)
चेन्नई - ३३५०० (सोने), ३३२०० (चांदी)

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मागणीत घट झालेय. तसेच जागतिक सोने व्यापाऱ्यांचा दबाब वाढत आहे. जागतिक मार्केटमधील न्यूयॉर्कमध्ये सोमवारी सोने १.३१ टक्के घसरुन १,०६०.१० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव १.७३ टक्के घसरुन १३.६५ डॉलर प्रति औंस झाले. तसेच लग्नसराईचा आठवडा संपल्याने दागिणे बनविणे थांबलेय. त्यामुळे सोने दरात घसरण झाल्याची दिसून येत आहे.

राजधानी दिल्लीत सोने ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धताचा भाव प्रत्येक १६० रुपयांनी घटला. सोने २५६९० आणि २५५४० रुपये प्रति १० ग्रॅम दर होता.