राष्ट्रपती मुखर्जी आणि मोईली यांचे 'कॉर्पोरेट' संबंध उघड!

कॉर्पोरेट विश्व आणि राजकारणी यांचे छुपे संबंध लपून राहिलेले नाहीत. याचंच आणखी एक उदाहरण समोर आलंय.

Updated: May 14, 2015, 11:47 AM IST
राष्ट्रपती मुखर्जी आणि मोईली यांचे 'कॉर्पोरेट' संबंध उघड! title=

नवी दिल्ली : कॉर्पोरेट विश्व आणि राजकारणी यांचे छुपे संबंध लपून राहिलेले नाहीत. याचंच आणखी एक उदाहरण समोर आलंय.

यूपीए सरकारमधले माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांचे एस्सार कंपनीसोबत असलेले कथित अर्थपूर्ण संबंध उजेडात आलेत.

'सेंट्रल फॉर पब्लिक इंटरेस्ट लेजिटेशन' या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या एका शपथपत्रात काही ईमेलच्या हवाल्यानं हा दावा करण्यात आलाय... 'डीएनए' या वृत्तपत्राकडे या शपथपत्राची प्रत आहे... या ईमेल्सवरून या कंपन्या आपल्या फायद्यासाठी मंत्र्यांची खासगी कामं करत असल्याचं उघड झालंय. 

प्रणव मुखर्जी यांच्या शपथविधीसाठी ममता बॅनर्जी, मिथून चक्रवर्ती यांच्यासह काही पत्रकारांसाठी कोलकाता-दिल्ली आणि परतीचं विमान एस्सारनं बुक केल्याचं एक ईमेल सांगतो. ही कंपनी संबंधित नेत्यांसाठी हॉटेल, कॅब याचं बुकिंग करत असल्याचंही या शपथपत्रात म्हटलंय. अनेकदा मंत्र्यांच्या विनंतीवरून काही जणांना कंपनीनं नोकऱ्या लावल्याचंही समोर आलंय... असे काही ईमेल आणि एसएमएस या शपथपत्रात जाहीर करण्यात आलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.