रेल्वे मासिक पास भाड्यात कपात शक्य, गौडांचे संंकेत

 रेल्वे भाडेवाढीमुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना येत्या 2-3 दिवसांत दिलासा मिळणार असल्याची माहीती महायुतीच्या खासदारांनी दिली आहे. रेल्वे मासिक पास भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 24, 2014, 04:59 PM IST
 रेल्वे मासिक पास भाड्यात कपात शक्य, गौडांचे संंकेत title=

नवी दिल्ली : रेल्वे भाडेवाढीमुळं त्रस्त झालेल्या मुंबईकरांना येत्या 2-3 दिवसांत दिलासा मिळणार असल्याची माहीती महायुतीच्या खासदारांनी दिली आहे. रेल्वे मासिक पास भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.

महायुतीच्या मुंबई-ठाण्यातल्या 10 खासदारांसह विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, आशिष शेलार, आरपीआय नेते रामदास आठवले यांच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत मुंबईकरांच्या मासिक पासच्या दरात जी वाढ झाली ती कमी करावी अशी प्रमुख मागणी महायुतीच्या खासदारांनी केली. मुंबईकरांच्या भावना आपण लक्षात घेऊन निर्णय घेणार असंल्याचं आश्वासन रेल्वेमंत्री सदानंद गौडा

यांनी दिल्याचं महायुतीच्या खासदारांनी सांगितलं. तसंच येत्या 2-3 दिवसांत भाडेवाढ कमी करण्याबाबत चांगली बातमी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. याचबरोबर मुंबईतल्या लोकल प्रवाशांसाठी रेल्वे बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यासंदर्भातही काही मागण्या रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आल्या.

दरम्यान, रेल्वे भाडेवाढीमुळं खिशाला चाप बसलेल्या मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. सरकारनं मेट्रोच्या दरवाढीविरोधात केलेली याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं महिनाभराच्या सवलतीनंतर म्हणजे ९ जुलैपासून मेट्रोचे नवीन दर लागू होणार आहेत. आता नवीन दरानुसार मेट्रोच्या प्रवासासाठी किमान १० तर कमाल ४० रुपये मोजावे लागणार आहेत.

सरकारनं नेमलेल्या भाडेवाढी संदर्भातल्या समितीचा अहवाल येईपर्यंत रिलायन्सची भाडेवाढ कोर्टानं वैध ठरवली आहे. रिलायन्ससोबत झालेल्या करारानुसार मेट्रोचे जने दर सरसकट दहा रुपये होते. आता कोर्टाच्या निर्णयामुळं रिलायन्सला दरवाढवण्याची मुभा मिळाल्यामुळं मुंबईकरांना लोकलपाठोपाठ मेट्रोच्या प्रवासासाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.