साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांवर गुन्हा दाखल

Updated: Jun 24, 2014, 04:02 PM IST
साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शंकराचार्यांवर गुन्हा दाखल title=

 

नवी दिल्ली : साईबाबांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंदांवर शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन समाजात तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावनांचा अपप्रचार करण्याच्या उद्देशानं वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. साईबाबा देव नसून त्यांच्या पूजा करु नका असं वक्तव्य शंकराचार्यांनी केलं होतं. तसंच साईबाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक नसल्याचंही विधन स्वरुपानंद यांनी केलं होतं. याविरोधात शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसंच साईभक्तांनी त्यांच्या पुतळ्याचं दहनही केलं होतं.

नेमकं काय म्हटलं होतं नेमकं शंकराचार्यांनी... आणि का? 

जगभरातील तमाम भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या देवत्वालाच आव्हान देण्यात आलं... आणि हे आव्हान दिलंय ते शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी... साईबाबांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानण्यासही शंकराचार्य तयार नसल्यानं मोठी खळबळ उडाली. शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांच्या यादीत देशाच्या राष्ट्रपतींपासून ते मोठमोठे फिल्मस्टार आणि क्रिकेटर सामिल आहेत. पण, द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती साईबाबांच्या पूजेला महत्व देत नाहीत. साईबाबांना गुरु मानण्यासही शंकराचार्यांनी नकार दिलाय.

साईबाबांच्या विरोधात एवढंच वक्तव्य करून स्वामी स्वरुपानंद सरस्वती थांबलेले नाहीत तर स्वामींनी साईंची पूजाच चुकीची ठरवली आहे. स्वामींनी याला हिंदू धर्मात फूट पाडण्याचा कट ठरवलंय. शिर्डीच्या साईबाबांचे भक्त देशातच नव्हे तर जगभरात पसरलेले आहेत आणि भक्तांकडून करोडो रुपयांचं दान साईंचरणी अर्पण केलं जातं. साईंना मिळणाऱ्या या कोट्यवधी रुपयांच्या धनावरही स्वरुपानंदांचा आक्षेप आहे.  

स्वामी स्वरुपानंदांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर साई भक्त संतप्त झालेत. त्यांनी उलट शंकराचार्यांनाच पाखंडी ठरवत माफी मागावी अशी मागणी केलीय. स्वरुपानंद सरस्वती, दिग्विजय सिंह यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे आणि आधीच्या वादांमुळे अनेकदा चर्चेत राहिलेत. पण त्यांनी ज्या विषयाला हात घातला तो विषय चर्चेत आला हे मात्र खरं...

गेल्या २०-३० वर्षांपासून साई ट्रस्टची वाढती संपत्ती आणि साईचरणी दिलं जाणारं दान यामुळे चर्चा रंगते. काही विरोधक साईंच्या वाढत्या लोकप्रियतेला मार्केटिंगचं तंत्र मानतात. पण प्रश्न हा आहे की स्वामी स्वरुपानंद यांचं हे वक्तव्य हिंदू धर्माच्या कथित मठाधिशांना वाटणारी भीती आहे की साईंच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे झालेली पोटदुखी आहे ?

शिर्डीच्या साईबाबांबद्दल खळबळजनक वक्तव्य करणारे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या आजवरच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

  • शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती... द्वारका पीठाचे शंकराचार्य
  • स्वरूपानंद सरस्वती द्वारका पीठाचे शंकराचार्य
  • 1924 मध्ये मध्य प्रदेशातील दिघोरीमध्ये जन्म, मूळ नाव पोथीराम उपाध्याय
  • 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले, वाराणसीमध्ये स्वामी करपत्री यांच्यासह अभ्यास
  • 19 व्या वर्षी स्वातंत्र्यसैनिक, 'चलेजाव' चळवळीत सहभाग
  • 'क्रांतीकारी साधू' अशी ओळख, दोन वेळा कारावासाची सजा
  • 1950 मध्ये स्वामी ब्रह्मानंद सरस्वतींकडून 'संन्यासी' म्हणून दीक्षा
  • 1953 मध्ये स्वामी कृष्णभोदशरम यांचे शिष्यत्व स्वीकारले
  • 'रामराज्य परिषद पार्टी'चे अध्यक्ष
  • कृष्णभोदशरम यांच्या निधनानंतर जोशीमठाचे शंकराचार्य
  • 1982 मध्ये द्वारका पीठाचे शंकराचार्य म्हणून मान्यता

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.