आमीरवर नेते-अभिनेत्यांचा हल्लाबोल

अभिनेता आमीर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर देशात पुन्हा एकदा वादविवादाला सुरूवात झाली आहे. भाजप नेत्यांनी आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीर खानच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, जर भारतात राहण्यात आमीर यांना भीती वाटत असेल, तर त्यांना ज्या ठिकाणी शांती वाटत असेल त्यांनी ठिकाणी त्यांनी रहावं.

Updated: Nov 24, 2015, 04:04 PM IST
आमीरवर नेते-अभिनेत्यांचा हल्लाबोल title=

नवी दिल्ली : अभिनेता आमीर खानच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर देशात पुन्हा एकदा वादविवादाला सुरूवात झाली आहे. भाजप नेत्यांनी आमीर खानवर निशाणा साधला आहे. आमीर खानच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, जर भारतात राहण्यात आमीर यांना भीती वाटत असेल, तर त्यांना ज्या ठिकाणी शांती वाटत असेल त्यांनी ठिकाणी त्यांनी रहावं.

शाहनवाज हुसेन
भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटलंय की, आमीर खान यांना भीती वाटत नाहीय, ते जनतेला घाबरवतायत. भाजप खासदार आणि कलाकार मनोज तिवारी यांनी म्हटलंय, आमीरच्या वक्तव्यावर मी दु:खी आहे. 

भाजप प्रवक्त्यांची प्रतिक्रिया
आमीरने असं वक्तव्य करून देशाला कलंकित केलं आहे, आमीर खान यांनी हे चुकीचं वक्तव्य केलं आहे, आमीरला या देशाची माफी मागितली पाहिजे, भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी म्हटलंय, अदभूत अतुल्य भारत आता असहिष्णू कसा झाला.

खासदार परेश रावल
खासदार परेश रावल याने सुद्धा आमीर खानच्या वक्तव्यावर म्हटलंय, देशभक्त कधी आपल्या मातृभूमीला सोडून शकत नाही, मातृभूमीची सेवा देशभक्त करतो. 

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल यांनी आमीर खानची पाठराखण केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय, आमीर खानचा एक-एक शब्द खरा आहे, या मुद्यावर ते बोलले मी त्यांचं कौतुक करतो.

अनुपम खेर
अभिनेता अनुपम खेर यांनी आमीर खान यांना ट्वीट करून सवाल केला आहे की, आपण कधी आपली पत्नी किरण राव यांना विचारलं की, किरणच्या मनात कधी देश सोडण्याचा विचार आला होता, आमीर खान यांनी कधी किरणला सांगितलं नाही का?, याच देशाने त्यांना आमीर खान बनवलं आहे. प्रिय आमीर या देशाने यापेक्षाही दुर्देवी परिस्थिती बघितली आहे, तेव्हा तुला देश सोडावंस का वाटलं नाही?.

एका कार्यक्रमात आमीर नेमका काय बोलला?
आमीर खान याने एका कार्यक्रमात सोमवारी सांगितलं, त्यांची पत्नी किरण राव यांच्या मनात देश सोडण्याचा विचार आला होता. तसेच मी सन्मान परत करण्याचाही विचार केला आहे. 

कार्यक्रमा दरम्यान आमीरने सांगितलं की, घरी आपण किरणशी देश सोडण्याच्या मुद्यावर चर्चा केली होती. किरण रावने व्यक्त केलेलं हे मत चिंतजनक आहे. कोणत्याही समाजासाठी सुरक्षेचा भाव आणि न्याय सर्वात महत्वाचा आहे. देशात मागील सहा-आठ महिन्यात देशात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.