केजरीवालांच्या शपथविधीला मोदी अनुपस्थित राहतील
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित राहणार आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असल्याने शपथविधी सोहळ्यास येता येणार नाही, असं नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना सांगितले आहे.
मात्र दिल्लीच्या विकासासाठी केंद्राकडून सहकार्य मिळेल तसेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करु असे आश्वासन मोदींनी केजरीवाल यांना दिले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत सकारात्मक वातावरणात चर्चा झाली असे मनिष सिसोदीया यांनी पत्रकारांना सांगितले.
१४ फेब्रुवारीरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत असून शनिवारी सकाळी शरद पवार यांच्या बारामतीतील एका कार्यक्रमात मोदी उपस्थित असतील. यानंतर दुपारी पुणे आणि संध्याकाळी मुंबईतील एका कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहे. १४ फेब्रुवारीला मोदी शनिवारी सकाळी सात वाजता दिल्लीतून निघणार असून रात्री उशीरा ते दिल्लीत परततील असे सूत्रांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.