वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे - पंतप्रधान मोदी

देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. 

Updated: Nov 7, 2014, 07:46 PM IST
वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे -  पंतप्रधान मोदी title=

वाराणसी : देशात वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण गरजेचे आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. त्याचवेळी वाराणसीमधील विणकरांनी ई-कॉमर्सच्या वाढत्या बाजारपेठेच्या माध्यमामधून ग्राहकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन केले. 

मोदी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रथमच आले होते.  मोदी यांनी यावेळी पूर्व उत्तर प्रदेशमधील बॅंकांच्या सक्षमीकरणासाठी 2,375 कोटींचे अर्थसहाय्यही जाहीर केले. वाराणसी हे येथील वस्त्रोद्योगासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे, असे ते म्हणालेत.

वस्त्रोद्योगामुळे गरीबातल्या गरीबासही रोजगार मिळत आहे.. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या अर्थसहाय्याच्या माध्यमामधून पूर्व उत्तर प्रदेशमधील १६ जिल्ह्यातील बॅंकांचे सक्षमीकरण केले जाणार आहे. 

पंतप्रधान मोदी वाणारसीत येणार असल्याने कडक  सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यावेळी त्यांच स्वागत केले.  यावेळी पंतप्रधान जयपूर गाव दत्तक घेण्याचा निर्णय केलाय. या निर्णयानंतर तिथल्या नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.