नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी VVIP कल्चर सोडत सामान्य ट्रॅफिकमधून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचं स्वागत करण्यासाठी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर पोहोचले. पीएम मोदींनी लोक कल्याण मार्ग ते दिल्ली एअरपोर्टपर्यंत कोणतीही ट्रॅफिक रिस्ट्रीक्शन डिस्टर्ब न करता प्रवास केला. इतर वेळेस पंतप्रधानांचा ताफा ज्या रस्त्यावरुन जाणार असतो तो रस्ता १० मिनिटं आधी सामान्यांसाठी बदलला जातो.
पंतप्रधानांनी कोणताही ट्रॅफिक रुट न मोडता 11.25 मिनटांनी एअरपोर्टसाठी निघाले. पंतप्रधानांना ताफ्यामध्ये तेव्हा फक्त ३ ते ४ गाड्या होत्या. 11 मूर्ती जवळ ट्रॅफिक जॅममुळे मोदींना काही वेळ थांबावं लागलं. यावेळी पंतप्रधानांनी बीएमडब्ल्यू नाही तर फॉर्च्यूनर गाडीतून प्रवास केला.