नवी दिल्ली : खादीचा पुरस्कार करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना युवकांमध्ये खादीबद्दलचे आकर्षण वाढल्याचंही मोदींनी म्हटलंय.
खादीत कोट्यवधी नागरिकांना रोजगार देण्याची ताकद असल्याचं मोदींनी म्हटलंय. स्टार्ट-अप योजना रोजगार करणा-यांसाठी एक सुवर्णसंधी असून या योजनेमुळं तरुणांमध्ये उत्साह संचारल्याचं मोदींनी म्हटलंय. यावेळी 50 टक्के शेतक-यांना पीक विमा योजनेत आणण्याचा सरकारचा विचार असल्याचंही मोदी म्हणालेत.
देशभरात काही संस्था, स्थानिकांमुळे रेल्वे स्टेशन्सना नवं रुप देऊन स्वच्छ भारत योजनेला हातभार लागत असल्याचा उल्लेखही मोदींनी आवर्जून यावेळी केला. बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. दरवर्षी 30 जानेवारीला मौन बाळगण्याचं आवाहनही मोदींनी केलंय.